मला दह्यातली मिरची मरणाची आवडते. पराठ्यांबरोबर खायला किंवा तशीच खायला सुद्धा. मिरची खूपच तिखट असेल तर अगदी हाय-हुय करायला लावते. पण दही आणि मिरचीचा स्मोकी फ्लेवर हे जीवघेणं मिश्रण आहे हे माझं अगदी ठाम मत आहे.
लागणारा वेळ:-
पंधरा मिनिटे
वाढणी:-
दोन माणसांसाठी एका वेळचे पोटभर खाणे
साहित्य:-
कृती:-
लागणारा वेळ:-
पंधरा मिनिटे
वाढणी:-
दोन माणसांसाठी एका वेळचे पोटभर खाणे
साहित्य:-
- हिरवी-लाल-पिवळी भोपळी मिरची (कोणतेही दोन रंग, प्रत्येकी एक हवाच. त्यातही हिरवा नसेल तरी चालेल) बारीक चिरलेली
- पाच सहा बेबी कॉर्न - गोल चकत्या कापून
- एक गाजर - साधारण मिरच्यांइतक्याच आकाराचे तुकडे केलेलं
- एक काकडी- साधारण मिरच्यांइतक्याच आकाराचे तुकडे केलेली
- दोन छोट्या/एकच मोठी हिरवी मिरची (ही प्रत्येकाने आपापल्या मगदुराप्रमाणे घ्यावी)
- टांगलेलं दही
- मिरपूड
- चवीपुरतं मीठ
- मूठभर कोथिंबीर
- अर्धा चमचा साखर / उभे काप केलेले चार खजूर
कृती:-
- हिरवी मिरची थेट गॅसवरती खरपूस भाजून घ्या. करपायला नको पण छान भाजली जायला हवी.
- एका बोलमध्ये टांगलेलं दही, मीठ, साखर, मिरपूड, बारीक चिरलेली कोथिंबीर एकत्र करून घ्या.
- सर्व भाज्या (साखर वगळली असेल तर खजूरासह) एका बोलमध्ये घ्या व त्यावर हे ड्रेसिंग ओता.
- हवं असेल तर रेफ्रिजरेट करा नाहीतर थेट खायला घ्या.
swati,
ReplyDeletekhoop masta blog chalu kela ahes. apan tar aajpasun tuza pankha zalo.